बेळगाव लाईव्ह : बेळगाव लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 77 नुसार निवडणूक प्रचार कालावधीत निवडणूक खर्च निरीक्षकाकडे तीन वेळा त्यांच्या निवडणूक खर्चाची माहिती सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली.
उमेदवारांना त्यांचे बँक पासबुक तसेच त्यांच्या खर्चाच्या लेखापुस्तकासह, सर्व मूळ पावत्या निवडणूक खर्च निरीक्षकांना वैयक्तिकरित्या किंवा त्यांच्या निवडणूक एजंटमार्फत सादर कराव्या लागतील.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातील निवडणूक रिंगणातील उमेदवारांनी आपले खाते पडताळणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात २६ एप्रिल, ३० एप्रिल आणि ४ मे अशा तिन्ही दिवशी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत सादर करावेत, सर्व उमेदवारांनी नियोजित तारखेला माहिती सादर करावी, असे जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.