बेळगाव लाईव्ह :वाढत्या उष्म्याच्या पार्श्वभूमीवर वकिलांना दिलासा देताना कर्नाटक पूर्ण न्यायालयाने अर्थात उच्च न्यायालयाने एका ठरावाद्वारे राज्यातील जिल्हा न्यायालये आणि अपिलीय न्यायालयांमध्ये (ट्रायल कोर्ट) काम करणाऱ्या वकिलांना उद्या 18 एप्रिल पासून 31 मे 2024 पर्यंत नेहमीचा काळा कोट न वापरण्याची सूट दिली आहे.
बेंगलोर वकील संघटनेच्या अध्यक्षांनी गेल्या 5 एप्रिल रोजी केलेल्या सादरीकरणाची दखल घेत कर्नाटक उच्च न्यायालयाने काल मंगळवारी एका ठरावाद्वारे काळा कोट न घालता न्यायालयीन कामकाजात भाग घेण्याची मोकळी राज्यातील वकिलांना दिली आहे.
त्यामुळे जिल्हा न्यायालये आणि ट्रायल कोर्ट्सच्या कामकाजात भाग घेताना उद्या गुरुवार दि. 18 एप्रिलपासून येत्या 31 मे 2024 पर्यंत वकिलांनी आपला नेहमीचा काळा कोट परिधान केला नाही तरी चालणार आहे, याची नोंद समस्त वकिलांनी घ्यावी
. त्याचप्रमाणे काळ्या कोटातून मोकळी देण्यात आलेल्या कालावधीत न्यायालयाच्या कामकाजात भाग घेताना वकीलांनी आपल्या नेहमीच्या सफेद नेक बँडसह साधा
स्वच्छ सफेद किंवा अन्य शांत रंगाचा (सोबर कलर) शर्ट, सलवार-कमीज आणि महिला वकिलांनी तशाच रंगाची साडी किंवा अन्य पोशाख परिधान करावा, असे आवाहन उच्च न्यायालयाच्या आदेशावरून न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल के. एस. भारत कुमार यांनी केले आहे.