बेळगाव लाईव्ह : वर्षभर अभ्यास आणि वर्षाच्या शेवटी परीक्षा.. शाळा आणि अभ्यास यातून मुलांना थोडासा दिलासा मिळतो तो उन्हाळी सुट्टीच्या माध्यमातून… मार्च अखेर ते मे अखेर या दरम्यान होणाऱ्या उन्हाळी सुट्ट्यांचे स्वरूप अलीकडे बदलले आहे.
काही वर्षांपूर्वी उन्हाळी सुट्टी म्हटलं कि मामाचे गाव, दिवसभर मैदानावर दत्तक राहणारी मुले, मातीत खेळणे, कैऱ्या, चिंचा, बोरं शोधत उनाडपणे फिरणे आणि सुट्टीतील अभ्यास घरच्यांची कटकट ऐकून पूर्ण करणे, शक्य असल्यास एखादा क्लास लावून ‘एक्स्ट्रा ऍक्टिव्हिटीज’ शिकणे.. यापलीकडे उन्हाळी सुट्टीची व्याख्याच नसायची. परंतु हल्ली काळानुरूप सर्वच गोष्टी बदलल्या.. यात उन्हाळी सुट्ट्या तरी कशा मागे राहणार? आता उन्हाळी सुट्टी सुरु होण्या आधीच सर्वत्र समर कॅम्पचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मुलांच्या विकासात भर पडते.
अलीकडच्या काळात समर कॅम्पला खूप महत्व आले आहे. बेळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातील ताशिलदार गल्ली येथे गेल्या दोन वर्षांपासून समर कॅम्पचे आयोजन केले जाते. सौ. स्नेहा सागर पाटील यांच्या माध्यमातून कपिलेश्वर उड्डाणपुलाजवळील स्लिम फिट जिम येथे सदर समर कॅम्प भरविले जाते.
या समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांना अनेक उपक्रमांतर्गत वैविध्यपूर्ण प्रशिक्षण दिले जाते. २ ते १३ अशा वयोगटातील बहुसंख्य मुले समर कॅम्पमध्ये सहभागी होतात. चित्रकला, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, खेळाचे विविध प्रकार, आर्ट अँड क्राफ्ट, अबॅकस, गाणी, नृत्य आणि धमाल ऍक्टिव्हिटीज या समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांसाठी राबविल्या जातात. यंदाही ताशिलदार गल्ली येथील स्लिम फिट जिम येथे समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून २१ मार्च ते ८ मे या कालावधीत ४ बॅच मध्ये समर कॅम्प घेण्यात येणार आहे.
या समर कॅम्पची पहिली बॅच २१ ते ३० मार्च आणि दुसरी बॅच १ ते १० एप्रिल यादरम्यान सायंकाळी ४ ते ६ यावेळेत भरविण्यात येणार आहे. तर तिसरी बॅच १५ ते २५ एप्रिल आणि चौथी बॅच २९ एप्रिल ते ८ मे या कालावधीत सकाळी ९.३० ते ११.३० या कालावधीत घेण्यात येणार आहे.
अभ्यासेतर विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना विरंगुळा मिळावा, टीव्ही – मोबाईल याव्यतिरिक्त इतर उपक्रमांच्या माध्यमातून बुद्धिमत्तेचा विकास व्हावा, शाळेचं वातावरण सोडून बाहेरच्या मुलांमध्ये त्यांना मिसळता यावं, कम्युनिकेशन करता यावं, मुलांमधील स्किल्स डेव्हलप व्हावीत आणि तणावरहित वातावरणात त्यांना मोकळेपणाने सुटीचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून सदर समर कॅम्प आयोजित करण्यात आले आहे.
इच्छुकांनी नाव नोंदणीसाठी सौ. स्नेहा सागर पाटील, संपर्क क्रमांक ८३१०५०८१२०, घ. नं. २४१, ताशिलदार गल्ली, बेळगाव यांच्याशी संपर्क साधावा.