Friday, November 15, 2024

/

असहाय्य वटवाघुळ पिलाला जीवदान

 belgaum

बेळगाव लाईव्ह:युवकाचे पक्षी प्रेम व सतर्कता तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या धडपडीमुळे आज गुरुवारी पहाटे एका वटवाघळाच्या पिलाला जीवदान मिळू शकले.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, आज पहाटे जय पाटील या दररोज सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या युवकाचा फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष दरेकर यांना फोन आला. त्याने एसपी ऑफिसच्या आवारात एक वटवाघळाचे पिल्लू असाहाय्य अवस्थेत जमिनीवर पडले असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे पिलाला कोणतीही इजा झालेली नाही.

बहुतेक ते पहिल्यांदा उडण्याचा प्रयत्न करताना जमिनीवर पडले असावे अशी माहिती त्याने दरेकर यांना दिली. सदर माहिती मिळताच संतोष दरेकर यांनी आपला सहकारी सौरभ सामंत याच्या समवेत तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच असहाय्य अवस्थेत जमिनीवर पडलेल्या त्या छोट्या पिलाला सुरक्षितपणे एका बॉक्समध्ये घालून त्याला जुन्या आरटीओ कार्यालयाजवळील वनविभागाच्या कार्यालयात दिले. त्यांच्या या स्तुत्य कृतीची वनाधिकाऱ्यांनी प्रशंसा केली.

सदर घटनेच्या निमित्ताने बोलताना समाजसेवक संतोष दरेकर म्हणाले की, मनुष्याप्रमाणे सर्व प्राणी आणि पक्षी देवाची मुले आहेत. त्यांना आपल्या माणसांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. या प्रजातींबाबतीत माणुसकी आणि मानवता दाखवूया.Darekar

त्यांच्यावर प्रेम करूया आणि त्यांना आमच्या कुटुंबाप्रमाणे वागवूया. तसेच जेंव्हा जेंव्हा त्यांना आमची गरज असेल तेंव्हा त्यांचे संरक्षण करूया. घरात एखादा माणूस आजारी असेल किंवा रस्ते अपघातात जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला असेल तर लोक लगेच त्याच्या मदतीसाठी धावतात.

पोलिस, रुग्णवाहिका यांना माहिती दिली जाते किंवा त्या मनुष्याचा जीव वाचवण्यासाठी जे काही शक्य असेल ते केले जाते. त्याचप्रमाणे सर्वांनी आपल्या सभोवतालचे प्राणी, पक्षी आणि निसर्ग वाचवण्यासाठी मदत केली पाहिजे. आपल्या चांगल्या भविष्यासाठी झाडे लावूया. आपल्या नद्या आणि तलाव स्वच्छ ठेवूया. तेंव्हा जर कोणाला कोणताही जखमी प्राणी किंवा पक्षी आढळला तर त्यांनी कृपया मला 9986809825 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संतोष दरेकर यांनी केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.