Friday, December 20, 2024

/

हिंडलगा कारागृहावर पोलिसांचा अचानक छापा

 belgaum

बेळगाव  लाईव्ह- हिंडलगा कारागृहातील अवैध धंदे रोखण्यासाठी शहर पोलीस उपायुक्त (कायदा व सुव्यवस्था) रोहन जगदीश यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी रविवारी सकाळी छापा टाकला.

त्यानंतर रोहन जगदीश यांनी पत्रकारांना सांगितले, ‘पाच सहाय्यक पोलिस आयुक्त आणि कर्मचारी छाप्यात सामील झाले होते. श्वानपथकामार्फत आम्ही संपूर्ण कारागृहाची पाहणी केली. तंबाखू आणि सिगारेटचे पॅकेट इथे मिळतात. सुरक्षा असली तरी हे सगळे आत कसे जातात याचा तपास करावा लागेल,’ असेही ते म्हणाले.

आजच्या छाप्यात मोबाईल मिळालेला नाही. पण, मोबाईल चार्जर मिळाला आहे. एक ब्लूटूथ उपकरण देखील सापडले आहे. हिंडलगा कारागृहात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहेत. कैदी मोबाईल फोन आणि टीव्ही वापरत असल्याचे आरोप ऐकायला मिळत होते.

यातच एका कैद्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन करून धमकी दिल्याची घटनाही घडली आहे. त्यामुळे पोलिसांकडून हिंडलगा कारागृहाबाबत विशेष सतर्कता घेण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.