बेळगाव लाईव्ह:रस्त्यावर जाहिरातींचे बोर्ड लावून, नेहमीच अतिशहाणपणा करून स्वतःला दादा म्हणून घेणाऱ्या आणि आपल्या विपरीत वागणे आणि सल्ल्याने अनेकांचे संसार उधळलेल्या त्या तथाकथित जाहिरातबाज उद्योजकाची आनंदवाडी आखाड्यातील कृती त्यालाच महागात पडली आहे.
नेपाळच्या पैलवानाच्या हातून माईक हिसकावून घेऊन कन्नडचे गोडवे गाणाऱ्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणाऱ्या या तथाकथित फॉरेन रिटर्न उद्योजकाची छी थू होऊ लागली आहे. महाराष्ट्राच्या सीमारेषेवर उद्योग थाटण्याच्या आविर्भावात अनेकांचे नुकसान केलेल्या या उद्योजकाने पातळी ओलांडल्यामुळे आता त्याला पुन्हा समाजात स्थान मिळणे अवघड बनले आहे.
खानापूर तालुक्याच्या एका गावातून येऊन मोठा झालेला हा उद्योजक लाळ घोटेपणा करण्यासाठी स्वतःच्या मातृभाषेचे इमान विसरला हा संतापाचा विषय ठरला आहे. याने केलेला हा प्रकार म्हणजे आपले ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून असेच झाले आहे. मराठी भाषिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला त्याची जागा दाखवून दिलीच आहे. आता समाजात होणारी लुडबुड थांबवून अशा मराठी द्रोह्यांना तडीपार करण्याची वेळ आली आहे.
कुस्तीचे मैदान म्हणजे मराठी वातावरण. बेळगावच्या कुस्तीला एक ऐतिहासिक परंपरा आहे. ढोल, ताशा, भगवे फेटे असे सारे चित्र आखाड्याच्या आजु बाजूने पाहायला मिळते. आनंदवाडीच्या आखाड्यातही यापेक्षा वेगळे चित्र नव्हते. हे वातावरण पर राज्यातून आलेल्या नेपाळच्या पैलवानाला समजले. त्याने समोर बसलेल्या मराठमोळ्या जनतेला अभिवादन करताना जय महाराष्ट्र म्हटले, तर चुकले कुठे? मात्र त्या उद्योजकाच्या अवयवातून अचानक कळ उठली.
त्याने माईक हिसकावून घेतला. कन्नडमध्ये काय बोलू लागला. पाहून म्हणून आलेल्या पैलवानाला तू गोंधळ करू नकोस, प्रॉब्लेम करू नकोस म्हणत त्याचा अपमान केला. त्याची उंची काढली. यामुळे कन्नडच्या संकरित बियाण्याचे दर्शनच त्याने घडविले. मराठीची कावीळ झाली कि माणसे अशी वागतात. कन्नड चा संकर झालेला उद्योजक रोषास कारणीभूत ठरलाय हे यामुळेच.
आजवर त्याचे असे अनेक प्रकार उघडकीला आले आहेत मात्र अनेकांनी पोटात घालून घेऊन सहनच केले आहे. एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात त्याने केलेले प्रताप आजही चर्चेत आहेत. दुसऱ्यांच्या आया बहिणींचा आदर न राखता त्याने सार्वजनिक पातळीवर केलेले चाळे असोत किंवा तरुण मुला मुलींना नोकऱ्यांचे आमिष दाखवून केलेली परवड असो, भंपक, लोचट आणि अश्लीलतेचा कळस असलेला हा संकरित सांड सध्या चर्चेचा आणि संतापाचा विषय ठरला. महाराष्ट्र आणि मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही असेच त्याला सामान्य जनता सांगू लागली आहे. आता माफी मागूनही त्याची अब्रू परत येणार नाही कारण त्यानेच आपल्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगली आहेत…. असेच म्हणावे लागेल.