बेळगाव लाईव्ह: कर्नाटक विधान सौध परिसरात पाकिस्तानच्या बाजूंनी दिलेल्या घोषणा प्रकरणी अखेर तीन जणांना अटक केली आहे.
कर्नाटक विधानसभेत मध्ये पाकिस्तानच्या बाजूनी घोषणाबाजी केल्याप्रकरणी विधानसभा पोलिसांनी तिघांवर सोमोटो गुन्हा दाखल केला होता त्यानुसार दिल्लीचा निवासी असलेला इलताज आरटी नगर बंगळुरुचा रहिवासी असलेला मुनव्वर आणि ब्याडगी येथील शफी नाशिपुडी या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार या तिघांपैकी एका व्यक्तीने पाकिस्तान तर उर्वरित दोघांनी जिंदाबाद असे ओरडले होते अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवार नासिर हुसेन यांनी विजय मिळवला होता त्यावेळी नासिर हुसेन यांनी विधान सौध परिसरात विजयोत्सव जल्लोष साजरा करत होते त्यावेळी त्यांच्या समर्थकांकडून या घोषणा दिल्या गेल्या होत्या. त्यानंतर राजकारणात जोरदार टीका टिप्पणी झाली होती त्यानंतर विधानसभा पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करून घेतला होता.
एफ.एस.एल.( फॉरेन्सिक लॅब)चा अहवाल स्थानिक उपस्थित लोकांनी दिलेल्या साक्षीवरून याशिवाय तपासा वेळी मिळालेल्या साक्षी पुराव्या नुसार तिघांवर गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तिन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजर करून पुन्हा पोलिसांनी कस्टडी घेतली आहे अधिक तपास सुरू करण्यात आलेला आहे.