Thursday, December 19, 2024

/

इलेक्ट्रिक बसेसच्या आगमनाला आचारसंहितेचा ब्रेक!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्य परिवहन महामंडळाकडून बेळगाव शहराला मिळणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस मार्चमध्ये मिळण्याची शक्यता मावळली आहे. निवडणुकीची आचारसंहिता आणि श्रेयवाद यामध्ये या बसेसचा पुरवठा अडकला असून आता त्या निवडणूक संपल्यानंतर जूनमध्ये मिळणार आहेत.

पंतप्रधान इलेक्ट्रिक ई -बस सेवा योजनेअंतर्गत बेळगावसह राज्यातील 11 शहरांनी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने आवश्यक गोष्टींची पूर्तता केली आहे. पंतप्रधान ई -बस सेवा योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यास पात्र असलेल्या राज्यातील शहरांमध्ये बेळगावसह म्हैसूर, मंगळूर, दावणगिरी, शिमोगा, तुमकुर, हुबळी, धारवाड, गुलबर्गा विजापूर आणि बल्लारी या शहरांचा समावेश आहे.

वायव्य परिवहन महामंडळाने बेळगावसाठी 100 आणि हुबळी -धारवाडसाठी 110 अशा एकूण 210 इलेक्ट्रिक बसची मागणी केंद्राकडे नोंदवली आहे. यापैकी 50 बसेसचा पहिला ताफा बेळगावला मार्च महिन्यात मिळणार होता. इलेक्ट्रिक बस सेवा ही केंद्राची योजना असून बेळगाव सध्या काँग्रेसचे मंत्री आहेत.

निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या बसेस जरी बेळगाव दाखल झाल्या तरी लोकप्रतिनिधींच्या हस्ते बसेसचा शुभारंभ करता येणार नाही. दरम्यान इलेक्ट्रिक बसचा ताफा जूनमध्ये दाखल होण्याची शक्यता परिवहन मंडळाने वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.