बेळगाव लाईव्ह:उन्हाळ्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशयाला आज शनिवारी सकाळी महापौर आणि उपमहापौरांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच जलाशयातील पाणी साठ्याबाबत माहिती जाणून घेतली.
बेळगाव शहराला 101 दिवस पुरेल इतका पाणीसाठा सध्या राकसकोप जलाशयामध्ये उपलब्ध असून दररोज 40 एमएलडी पाणी उपसा केला तरी येत्या 15 जूनपर्यंत पाणी पुरेल, अशी माहिती एल अँड टी कंपनी व कर्नाटक पायाभूत सुविधा मंडळाने गेल्या बुधवारी झालेल्या पाणी पुरवठा आढावा बैठकीत दिली होती.
या पार्श्वभूमीवर महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांनी आज शनिवारी सकाळी प्रत्यक्ष राकसकोप जलाशयाला भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून जलाशयातील पाणी साठ्याची माहिती जाणून घेतली. त्यांच्या समवेत उपस्थित असलेल्या पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी जलाशयातील सध्याच्या पाणी साठाबाबत उभयतांना माहिती दिली.
गतवर्षी 2023 च्या पावसाळ्यात राकसकोपच्या पाणलोट क्षेत्रात केवळ 1776 मि.मी. पाऊस झाला आहे. मात्र तरीही 2022 तुलनेत यंदा राकसकोप जलाशयात 2.30 फूट अतिरिक्त पाणी साठा आहे.
गेल्या ऑक्टोबरपासून मार्कंडेय नदीच्या पात्रातून दररोज 32 एमएलडी पाण्याचा उपसा करून शहराला पाणीपुरवठा केला जात अशी माहितीही अधिकाऱ्यांनी पुरवली.