बेळगाव लाईव्ह :भाजपची पहिली सूची जाहीर झाल्यावर आता आगामी मंगळवार ५ रोजी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा हे बेळगाव दौऱ्यावर येत आहेत.
नड्डा यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच ग्रामीण भाजपच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्य भाजपचे प्रधान कर्यादर्शी सुनीलकुमार यांनी सांगितले की भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जीपी नड्डा आहे मंगळवारी चार रोजी बेळगावला येणार असून ५ रोजी बेळगाव जिल्ह्यातील भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते मार्गदर्शन करणार आहेत.
मंगळवारी सकाळी चिकोडी येथे भाजपच्या बूथ लेवल कार्य करताना ते मार्गदर्शन करणार असून दुपारी बेळगाव येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या उद्घाटन कार्यक्रमात सहभागी होणार असून सायंकाळी जिल्हा भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची चर्चा करणार आहेत.
बेळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ भाजपच्या नेत्यांची होणाऱ्या बैठकीत बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारा संदर्भात चर्चा होणार असल्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे