Wednesday, November 20, 2024

/

किटवाड धरणात बुडाला बेळगावचा युवक

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मित्रांसोबत फिरायला गेलेला वैभव नगर बेळगाव येथील युवक किटवाड येथील लघु पाट बंधारे धरण क्रमांक 1 मध्ये बुडाल्याची घटना बुधवार 13 रोजी सायंकाळी 4 वाजता बेळगाव जवळील महाराष्ट्रातील किटवाड येथे घडली आहे.

उजेब तनवीर मुजावर वय 17 रा. वैभव नगर बेळगाव असे या घटने तील मयत युवकाचे नाव आहे.

बेळगाव येथील विद्यार्थी सहलीसाठी किटवाड धरणार गेले होते सेल्फी काढणे धरणात अंघोळ करणे यासारखे प्रकार पाण्यात विद्यार्थ्यांकडून सुरू होते कालकुंद्री कडच्या बाजूने उजेब नावाचा युवक पाण्यात बुडाला तो वर आलाच नाही त्याला बाहेर काढण्यासाठी त्याच्या मित्रांनी प्रयत्न केले मात्र त्यांना यश मिळाले नाही.Kitwad

सायंकाळी 7 नंतर बेळगाव येथील पाणबुडे आणि रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरू होती मात्र रात्री साडे नऊ पर्यंत तरी बुडालेल्या युवकाचा मृतदेह मिळाला नव्हता.या प्रकरणी चंदगड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.गेल्या चार ते पाच वर्षात या धरणात अंदाजे 8 ते 10 जणांनी प्राण गमावले आहेत.

अनेकदा सूचना करूनही परिसराची माहिती नसलेले पर्यटक पाण्यात जाण्याचे धाडस करत असतात जीव गमावत असतात किटवाड आणि कालकुंद्री ग्राम पंचायती कडून लावण्यात आलेले सावधान इशारा फलक अज्ञातांकडून काढून टाकले जातात पर्यटकांनी यापुढे तरी दक्षता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.