Wednesday, January 22, 2025

/

खानापूर समिती बैठकीत लोकसभा निवडणुकीवर चर्चा

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राष्ट्रीय पक्षांनी मराठी भाषिकांना गृहीत धरण्याचे काम केले आहे. मराठी भाषिकांवर अन्याय होताना राष्ट्रीय पक्षांचे नेते चिडीचूप होतात. मराठी भाषिकांना केवळ मतदानापुरता विचारात घेणाऱ्या राष्ट्रीय पक्षांना अद्दल घडविणे आवश्यक असल्याचे मत खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी व्यक्त केले.

आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीने आपला उमेदवार द्यावा की नाही याबाबतचा निर्णय लवकरच कार्यकर्त्यांची व्यापक बैठक घेऊन घेण्यात येईल असा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई होते.

यावेळी उपस्थित बहुसंख्य कार्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीपासून समिती अलिप्त राहत असल्याने राष्ट्रीय पक्षांचे फावले असल्याचे सांगितले. लोकसभा निवडणुकीतील समितीची उणीव मराठी भाषिकांना राष्ट्रीय पक्षांच्या आमिषांना बळी पडण्यास कारणीभूत ठरत आहे. निवडणूक न लढविल्यामुळे मराठी भाषिकांना गृहीत धरण्याचा प्रकार घडत आहे. मराठी नामफलक, अंगणवाडी भरतीतील अन्याय यासारख्या ज्वलंत प्रश्नांवर राष्ट्रीय पक्षाचे नेते मूग गिळून गप्प आहेत.Khanapur

त्यांना समितीची ताकद दाखवणे गरजेचे असल्याचे मत तरुण कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. यावेळी कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, निरंजन सरदेसाई, प्रकाश चव्हाण, जयराम देसाई, मारुती परमेकर, डी. एम. भोसले, ॲड अरुण सरदेसाई, बाळासाहेब शेलार, राजाराम देसाई, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, रणजीत पाटील, रमेश धबाले, मुकुंद पाटील, नागेश भोसले आदींची भाषणे झाली. सचिव आबासाहेब दळवी यांनी आभार मानले.

आनंदवाडी कुस्ती आखाड्यात जय महाराष्ट्र घोषणा देण्यापासून पैलवानाला रोखणाऱ्या उद्योजक श्रीकांत देसाई यांचा निषेध करण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.