Tuesday, January 7, 2025

/

बेळगाव लाईव्ह इम्पॅक्ट; ‘तो’ मोटरसायकल स्वार पोलिसांच्या ताब्यात

 belgaum

बेळगाव लाईव्ह:सदाशिवनगर, डबल रोडवर डिफेक्टिव्ह बाईक सायलेन्सरचा कर्णकश आवाज करत दुचाकी चालवून ध्वनिप्रदूषणासह रात्रीची शांतता बिघडवणाऱ्या विघ्न संतोषी मोटरसायकल स्वाराला एपीएमसी पोलीसांनी काल रात्री ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे. बेळगाव लाईव्हच्या वृत्ताची दखल घेत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून डिफेक्टीव्ह बाईक सायलेन्सरचा आवाज करत दुचाकी भरधाव चालविण्याचा प्रकार सदाशिवनगर लास्ट बस स्टॉप येथे डबल रोड मार्गावर सुरू होता.

सदाशिवनगर, बॉक्साईट रोड, हनुमान नगर, शिवबसव नगर या ठिकाणी संबंधित व्यक्ती डिफेक्टिव्ह बाईक सायलेन्सरचा कर्णकश आवाजात मोटर सायकल चालवून मनस्ताप देत होती.Rash driving

बेळगाव लाईव्हने यासंदर्भात ‘पोलीस या दुचाकीस्वाराचा बंदोबस्त करतील का?’ या शीर्षकाखाली काल गुरुवारी वृत्त प्रसिद्ध केले होते. सदर वृत्ताची दखल घेत एपीएमसी पोलिसांनी काल रात्री संगमेश्वरनगर सर्कल येथे संबंधित दुचाकीस्वाराला त्याच्या मोटरसायकलसह ताब्यात घेऊन गुन्हा नोंदवला.

पोलिसांच्या या कारवाईमुळे नागरिकात समाधान व्यक्त होत असून ते बेळगाव लाईव्हला दुवा देत आहेत. पोलिसांनी बातमी प्रसिद्ध होताच 24 तासाच्या आत कारवाई झाल्याने पुन्हा एकदा बेळगाव लाईव्ह डिजिटल माध्यमाची विश्वासार्हता सिद्ध झाली आहे.

पोलीस ‘या’ दुचाकीस्वाराचा बंदोबस्त करतील का? https://belgaumlive.com/2024/03/belgaum-police-demand/

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.