Saturday, January 18, 2025

/

‘हेस्कॉम’ सर्व्हर दहा दिवस राहणार डाऊन!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : राज्यात वीज वितरण कंपन्यांची सर्व्हर सेवा दहा दिवसांसाठी तांत्रिक दुरुस्तीसाठी बंद केली जाणार असून दि. १० ते १९ मार्च दरम्यान सर्व्हरडाऊन केला जाणार असल्याची माहिती हेस्कॉमने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सर्व्हर डाऊनमुळे इ-पेमेंट करता येणे शक्य नाही. शिवाय इ – पेमेंट सह इतर कामकाजालादेखील ब्रेक लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

हुबळी -धारवाड, बेळगाव, कारवार, निप्पाणी, जमखंडी, बैलहोंगल, लक्ष्मेश्वर, नरगुंद, रामदुर्ग, चिकोडी, गुळेदगुड्ड, महालिंगपूर, अथणी, भटकळ, दांडेली, इंडी, सौंदत्ती, सवनूर, शीरसी, कुमटा, बागलकोट, रबकवी, बनहट्टी, गदग, गोकाक, हावेरी, इल्लकल, मुधोळ, राणेबेन्नूर आणि विजयपुरा आदी शहरांमध्ये सर्व्हर डाऊन ची समस्या असेल.

यादरम्यान वीज पुरवठ्यात कोणताही व्यत्यय येणार नाही. तसेच सॉफ्टवेअरच्या अपग्रेडेशन दरम्यान, थकीत बिले असणाऱ्या ग्राहकांची वीज जोडणी कापली जाणार नाही. यादरम्यान विजेचे बिल ग्राहकांना देण्यात येणार आहे. मात्र २० मार्च नंतरच सदर बिले अपडेट करण्यात येणार आहेत.Hescom

पुढील महिन्यात गुढी पाडवा साजरा केला जाणार असून तत्पूर्वी नवीन घरांचा ताबा मिळविण्यासाठी नागरिकांची धांदल सुरू झाली आहे. वास्तुशांतीचे मुहूर्त असल्याने मीटर घेण्यासाठी नागरिकांचे हेलपाटे सुरू आहेत. मात्र तांत्रिक दुरुस्तीसाठी सर्व्हर बंद करण्यात येणार असून यादरम्यान १० ते १५ दिवस नवीन वीजमीटर घेणे, नावामध्ये बदल, पेमेंट करणे या सर्व सुविधांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक मीटरचा तुटवडा शहरात जाणवू लागला आहे. मीटर मिळत नसल्याने ग्राहक व हेस्कॉमच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रकार घडत आहेत. इलेक्ट्रिक कंत्राटदारही वैतागले असून मीटर वेळच्यावेळी उपलब्ध करून देण्याची मागणी केली जात आहे. तांत्रिक दुरुस्तीच्या कारणास्तव १० दिवस सर्व्हर बंद असल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.