Thursday, October 31, 2024

/

अधिकाऱ्याच्या विरोधात संतप्त कंत्राटदारांचे ठिय्या आंदोलन

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बिलावर आवश्यक स्वाक्षरी करण्यास टाळाटाळ करून कंत्राटदाराला अर्वाच्य शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक देणारे अधिकारी सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता ए. एन. बिरादार पाटील यांची नोकरीवरून तात्काळ उचल बांगडी करावी, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा कार्यनिरत कंत्राटदार संघटनेतर्फे आज शनिवारी जिल्हा पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारात ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.

बेळगाव जिल्हा कार्यनिरत कंत्राटदार संघटनेतर्फे छेडण्यात आलेल्या या आंदोलनात बहुसंख्य कंत्राटदार सहभागी झाले होते. जिल्हा पंचायत कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरील पायऱ्यांवर या मांडून निदर्शने करणारे हे संतप्त कंत्राटदार साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या आंदोलनाची माहिती मिळताच जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी आंदोलनकर्त्या कंत्राटदारांची भेट घेतली.

त्यावेळी कंत्राटदार संघटनेच्या संतप्त पदाधिकाऱ्यांनी आपले सहकारी कंत्राटदार आडव्याप्पा तोकदल यांच्यावर झालेल्या अन्यायाची सीईओ शिंदे यांना माहिती देण्याबरोबरच सहाय्यक कार्यनिर्वाहक अभियंता ए. एन. बिरादार पाटील तात्काळ नोकरीवरून काढून टाकण्यात यावे अशी मागणी केली यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा स्वीकार करून जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी लवकरात लवकर चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले.Protest

ठिय्या आंदोलनाप्रसंगी बेळगाव लाईव्ह शी बोलताना बेळगाव महापालिका कंत्राटदार संघटनेचे उपाध्यक्ष जितेंद्र चौगुले म्हणाले की, आमचे सहकारी कंत्राटदार आडव्याप्पा तोकदल त्यांच्या बिलावर कार्यनिर्वाहक अभियंता असलेल्या सरकारी अधिकाऱ्याची स्वाक्षरी हवी होती. त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या कंत्राटदार तोकदल यांना संबंधित बिरादार पाटील नामक कार्यनिर्वाहक अभियंता असलेल्या अधिकाऱ्याने स्वाक्षरी तर दिलीच नाही, उलट अर्वाच्य शिवीगाळ करून अपमानास्पद वागणूक दिली आहे.

निवडून दिलेले सरकार आणि त्याच्या हाताखाली काम करणारे हे अधिकारी म्हणजे जनतेचे सेवक असतात. सेवक म्हणून नाहीतर किमान माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांची भाषा तरी व्यवस्थित हवी. आमच्या सहकाऱ्याचा अपमान हा आम्हा सर्वांचा अपमान आहे आणि तो आम्ही खपवून घेणार नाही. आज आम्ही हे आंदोलन करत आहोत ते बिलासाठी नाही तर त्या अधिकाऱ्यासाठी आहे. कर्तव्य चुकारपणाबद्दल यापूर्वी संबंधित अधिकारी दोन वेळा निलंबित झाला आहे.

चार वेळा जेलची हवा खाऊन आलेला हा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता सध्या हुक्केरी येथे म्हणून कार्यरत आहे. या पद्धतीची गुन्हेगारी व अमानवी वृत्ती असलेली व्यक्ती शासनाची सेवा करतेय, हुकूमशाही गाजवते हे निषेधार्ह आहे असे सांगून आम्हाला जनतेची सेवा करणारा अधिकारी हवा आहे.

तेंव्हा बिरादार पाटील नामक त्या अधिकाऱ्याला तात्काळ नोकरीवरूनच काढून टाकण्यात यावे अशी मागणी चौगुले यांनी केली. यावेळी पीडित कंत्राटदार कंत्राटदार आडव्याप्पा तोकदल यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाची प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.