बेळगाव लाईव्ह:हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुरुशांत दाशाळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या रविवारी रात्री मुत्नाळ ब्रिज जवळ गांजा वाहतूक करणाऱ्या दोघाजणांना अटक करून त्यांच्याकडील गांजासह एकूण 32,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
भीमप्पा मरनिंगप्पा कलकेरी (वय 26) आणि शिवानंद नागप्पा बुडरकट्टी (वय 21, दोघे रा. कल्लूर, ता. धारवाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी या दोघांकडून 2480 रुपये किमतीचा 248 ग्रॅम गांजा, रोख 100 रुपये, 20,000 किमतीचे दोन मोबाईल संच आणि मोटरसायकल असा एकूण 32,580 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक केलेल्या दोघा जणांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांची रवानगी हिंडलगा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.
उपरोक्त कारवाईबद्दल पोलीस आयुक्त आणि उपायुक्त आणि हिरेबागेवाडी पोलीस निरीक्षक व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करून शाबासकी दिली आहे.