बेळगाव लाईव्ह : लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची प्रतीक्षा उद्या संपणार असनून उद्या दुपारी ३ वाजता निवडणुकीचा मुहूर्त निश्चित केला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीसंदर्भात निवडणूक आयोगाची बैठक संपन्न झाली असून बैठकीत दोन्ही नूतन आयुक्तांना निवडणुकीच्या तयारीची माहिती देण्यात आली.
निवडणूक आयुक्त उद्या दुपारी १.३० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनात पत्रकार परिषद घेऊन लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जारी करतील.
शनिवार दिनांक 16 मार्च रोजी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद बोलावली आहे.या पत्रकार परिषदेत लोकसभा निवडणुकीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर होणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेला सुरुवात होईल.
यावेळीही सात टप्प्यात विविध राज्यातील मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता आहे. दरम्यान उद्या निवडणुका जाहीर होताच आचारसंहिता ही जारी होणार आहे. त्याचबरोबर २० मे नंतर निकाल जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.