बेळगाव लाईव्ह: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने दुसरी यादी जाहीर केली असून कर्नाटकातल्या 20 लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत.
चिकोडी मधून दुसऱ्यांदा विद्यमान खासदार अण्णासाहेब जोले यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर बेळगाव आणि कारवार हे बहुचर्चित लोकसभा मतदारसंघ पेंडिंग ठेवण्यात आलेले आहेत. त्यामुळे आता बेळगाव आणि कारवारी या लोकसभा उमेदवारासाठी भाजपचे तिसऱ्या यादीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
बुधवारी सायंकाळी केंद्रीय निवडणूक समितीने प्रसिद्ध केलेल्या दुसऱ्या यादीत कर्नाटकच्या 20 मतदारसंघाचे उमेदवार जाहीर करण्यात आलेले आहेत.
हावेरी माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई धारवाड मधून प्रहलाद जोशी, बागलकोट मधून पी सी गद्दीगौडर,विजापूर रमेश जिगजिनगी,गुलबर्गा उमेश जाधव,बिदर भगवंत खुबा, कोप्पळ डॉ बसवराज क्यातुर, बेळळारी बी श्रीरामलू, दावनगेरे गायत्री सिध्देश्वर,शिमोगा बी एस राघवेंद्र,उडुपी चिक्क मंगळूर कोटा श्रीनिवास पुजारी
मंगळूर मधून कॅप्टन ब्रिजेश चौटा, तुमकुरू व्ही सोमान्ना,मैसूर यदुविर चामराज वडेयर, चाम्राजनगर एस बालराज, बंगळुरु ग्रामीण सी एन मंजुनाथ, बंगळुरु उत्तर शोभा करंदलाजे, बंगळुरु सेंट्रल पी सी मोहन बंगळुरु साऊथ तेजस्वी सूर्या