Sunday, January 5, 2025

/

सायबर फसवणूक रोखण्यासाठी ‘चक्षू’ प्रणाली

 belgaum

बेळगाव लाईव्ह : सायबर सुरक्षा बळकट करण्यासाठी तसेच ऑनलाइन फसवणूक रोखण्यासाठी भारत सरकारने संचार साथी उपक्रमांतर्गत चक्षु पोर्टलचे डीआयपी प्रणालीचे अनावरण केले आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान आणि दळणवळण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या नव्या प्रणालीची घोषणा नुकतीच केली असून देशभरात होत असलेली डिजिटल क्रांती आणि त्या दरम्यानच वाढलेली सायबर गुन्हेगारी यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाची पावले टाकत आहे.

चक्षु पोर्टल, संचार साथी उपक्रमाचा एक महत्त्वाचा घटक असून डिजिटल कम्युनिकेशन प्लॅटफॉर्म वापरुन वापरकर्त्याला म्हणजेच युजर्सला त्रास देणारे सायबर गुन्हेगार, त्यांचे सायबर क्राईम आणि फसव्या कारवायांविरुद्ध गंभीर उपाययोजना करणे आणि या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी हा मंच सक्रीय भूमिका बजावेल.

गेल्या नऊ महिन्यांत फसवणुकीशी संबंधीत अनेक घटनांमध्ये १ कोटींहून अधिक मोबाइल क्रमांक आधीच डिस्कनेक्ट करून, गुन्हेगारांविरुद्ध त्वरीत कारवाई करण्याची हे पोर्टल खात्री देते, असे पोर्टलबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री वैष्णव म्हणाले.

चक्षु सोबतच दूरसंचार विभागाने सुरू केलेला आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे डिजिटल इंटेलिजेंस प्लॅटफॉर्म, ज्याचा उद्देश कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी, बँका आणि वित्तीय संस्थांमध्ये फसवणुकीचा सर्वसमावेशकपणे सामना करण्यासाठी सहकार्य वाढवणे आहे.

सायबर फसवणूक शोधण्यात आणि रोखण्यात चक्षु आणि डीआयपी कार्यक्षम असून देशाची सायबर सुरक्षा फ्रेमवर्क मजबूत होईल असा आशावाद मंत्री वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. फसवणुकीने हस्तांतरित केलेल्या निधीची वसुली करण्यासाठी आणि गुंतलेली खाती गोठवण्याच्या उपाययोजनांसह तपास त्वरित सुरु करण्यात येणार असून याच काळात फसवणुकीसाठी वापरण्यात आलेले १७ लाख मोबाइल क्रमांक ब्लॉक करण्यात आल्याचा खुलासाही वैष्णव यांनी केला आहे.

सायबर-गुन्ह्याचा किंवा आर्थिक फसवणुकीस बळी पडलेल्या नागरिकांनी सायबर-गुन्हेगारी हेल्पलाइन नंबर १९३० वर किंवा भारत सरकारच्या https://www.cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.