बेळगाव लाईव्ह : बेळगाव पोलीस आयुक्तपदी नव्याने रुजू झालेल्या नूतन पोलीस आयुक्तांनी कालच पदभार स्वीकारला आणि बेळगावच्या कायदा आणि सुव्यवस्थेसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करण्याचे सांगितले.
तर दुसरीकडे चक्क कायदाच हातात घेत एका कार चालकाने बसचालकाला एअरगन रोखून खुलेआम दादागिरी केल्याची घटना आज बेळगाव शहरात घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आर. एन. शेट्टी महाविद्यालयाच्या सर्कलजवळ आज दुपारी सीबीटीच्या दिशेने बस प्रयाण करत होती.
यादरम्यान बसच्या समोर अचानक एक कार आली. आझम नगर येथील मोहम्मद शरीफ नामक व्यक्ती कारमध्ये होती तर समोरून बसचालक आपल्या दिशेने बस घेऊन जात होता.
दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. आणि याचे पर्यवसान अर्वाच्च शब्दात शिवीगाळ करण्यात झाले. यादरम्यान परिस्थिती गंभीर बनली आणि मोहम्मद शरीफ नामक व्यक्तीने थेट बसचालकाला एअरगन दाखवत दादागिरी केली.