बेळगाव लाईव्ह:बेळगाव आणि बागलकोट जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्र.748 एएनच्या बेळगाव -हुनगुंद -राचूर विभागाच्या चौपदरी करण्यासाठी 2,675.31 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग व भू -परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी ते पत्रकारांशी बोलत होते. संपर्काच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत महत्त्वाचा महामार्ग असल्यामुळे बेळगाव ते राचूर दरम्यानच्या महामार्गाच्या चौपदरीकरणासाठीचा निधी केंद्राने मंजूर केला आहे असे त्यांनी सांगितले.
अलीकडेच बेळगाव भेटीवर आलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महत्त्वाच्या रस्ते प्रकल्पांना चालना दिली होती.
Sankeshwar-Amboli-Konkan highway must be extended to Tasgaon Pune express way and the Sankeshwar bypass must be easily accessible to the Karnataka’s Kanagala Industrial development area, which will give a boost to the region’s overall development. Even land acquirement will be the easiest.