बेळगाव लाईव्ह :सीमा भागातील तीन लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे गुरुवारी सायंकाळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने जाहीर केलेल्या सूचीमध्ये कर्नाटकातील एकूण 28 पैकी 14 जागांचे उमेदवार यांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बेळगाव कारवार आणि चिकोडी या तिन्ही मतदारसंघाचा देखील समावेश आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघातून महिला आणि बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल हेब्बाळकर यांना तर चिकोडी लोकसभा मतदारसंघातून अपेक्षेप्रमाणे बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियांका जारकीहोळी यांना उमेदवारी देण्यात आली आहे याशिवाय कारवार लोकसभा मतदारसंघातून खानापूरच्या माजी आमदार अंजलीताई निंबाळकर यांची वर्णी लागली आहे.
बेळगाव आणि चिकोडी या दोन मतदारसंघात विद्यमान काँग्रेस सरकारचे मंत्री महोदयांच्या पुत्र आणि कन्येला उमेदवारी मिळाली असून बेळगाव चिकोडी लोकसभा मतदारसंघातील दोन्ही उमेदवार युवा आहेत .
मागील विधानसभा निवडणुकीत खानापूर विधानसभा मतदार संघातून पराभव स्वीकारलेल्या अंजली निंबाळकर यांना कारवार लोकसभा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.
गुरुवारी सायंकाळी काँग्रेसच्या तिन्ही मतदारसंघातील उमेदवारांची यादी घोषणा करण्यात आली आहे भाजपकडून केवळ चिकोडी मतदारसंघातून अण्णासाहेब जोल्ले यांची उमेदवारी जाहीर झाली आहे याव्यतिरिक्त कारवारांनी बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार अद्याप घोषित होणे बाकी आहे.
बेळगाव मधून माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे मात्र त्याचे अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही तर शुक्रवारी सायंकाळी कारवार आणि बेळगाव या दोन्ही मतदारसंघातील भाजपचे उमेदवार देखील जाहीर होण्याची शक्यता आहे.
कर्नाटकातील 14 काँग्रेसची उमेदवारांची सूची अशी:
बेळगाव :मृणाल हेब्बाळकर, चिकोडी: प्रियांका जारकीहोळी, कारवार :अंजली निंबाळकर, बागलकोट: संयुक्ता पाटील, गुलबर्गा: राधा कृष्णा, रायचूर : कुमार नाईक, बिदर: सागर खंड्रे, कोपपळ :राजशेखर हिटनाळ, धारवाड : विनोदी आसुटी, दावनगेरे:प्रभा मल्लिकार्जुन, उडुपी चिक्कमंगलुर: डॉ. जयप्रकाश हेगडे,मंगळूर : डॉ पदमराज, चित्रदुर्ग: बीएमचंद्राप्पा, मैसूर: एम लक्ष्मण, बेंगळुरू नॉर्थ: डॉक्टर एम व्ही राजीव गौडा , बेंगळूर सेंट्रल: डॉ मन्सूर अली खान आणि बेंगळूर साउथ : सौम्या रेड्डी