Monday, January 20, 2025

/

शहर, तालुक्यात आज -उद्या दारू विक्री बंद!

 belgaum

बेळगाव लाईव्ह:होळी व रंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त इडा मार्टिन मार्बनिंग यांनी बेळगाव शहर व तालुक्यात दोन दिवस दारू विक्री बंदीचा आदेश जारी केला आहे.

होळी व रंगपंचमी निमित्त पोलीस आयुक्तांनी बेळगाव शहर व उपनगरात आज रविवार दि. २४ मार्च रोजी दुपारी २ पासून उद्या सोमवार दि. २५ मार्च रोजी मध्यरात्री ११.५९ पर्यंत वाईन शॉप, बार, दारू दुकाने बंद ठेवण्याचा आदेश बजावला असून, क्लब व हॉटेलमध्येही या काळात दारूपुरवठा करू नये, अशी सक्त सूचना केली आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर अबकारी कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशाराही पोलीस आयुक्तांनी दिला आहे. त्याचबरोबर अबकारी निरीक्षक व अबकारी अधीक्षकांनी यासाठी योग्य कारवाई करण्याची सूचना देखील पोलीस आयुक्त मार्टिन यांनी केली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.