बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या एकूण 102 विकास प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पाचे काम चालू असून 96 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी 67 प्रकल्प संबंधित विभागाकडे सुपूर्द करण्यात आले असून 29 प्रकल्प सुपूर्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडच्या 102 विकास प्रकल्पांसाठी एकूण 930 कोटी रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे.
यापैकी 6 प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत (पीपीपी) पूर्ण केले जाणारा असून त्यावर 211.6 कोटी रुपये खर्च होणार आहेत.
याखेरीज पूर्ण झालेल्या प्रकल्पांसाठी 776.14 कोटी रुपये खर्च आला आहे. यापैकी एक प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत 4.90 कोटी रुपये खर्च करून पूर्ण करण्यात आला आहे.
सध्या सुरू असलेले सहा विकास प्रकल्प 153.86 कोटी रुपये खर्चाचे असून यापैकी 5 प्रकल्प सार्वजनिक खाजगी भागीदारीत पूर्ण केले जाणार आहेत. त्यासाठी 206.16 कोटी रुपये खर्च येणार आहे. ही आकडेवारी गेल्या 6 ऑक्टोबर 2023 पर्यंतची आहे.