बेळगाव लाईव्ह : सतीश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे पाणी पुरवठ्यासाठी टँकर व कचऱ्याची उचल करण्यासाठी बेळगाव उत्तर व दक्षिण मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी महानगरपालिकेला वाहन वितरीत करण्यात आले. या वाहनांचे वितरण युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्या हस्ते करण्यात आले.
महानगरपालिकेच्या आवारामध्ये सतीश जारकीहोळी फाउंडेशनतर्फे वितरीत करण्यात आलेल्या वाहनांना राहुल जारकीहोळी, आमदार राजू सेठ यांच्या हस्ते चालना देण्यात आली.
बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या सूचनेवरून फौंडेशनतर्फे सुरू असलेल्या सामजिक कार्याच्या उपक्रमांतर्गत या वाहनांची सोय करून देण्यात आली.
नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून गैरसोय होऊ नये यासाठी मोफत पाणीपुरवठा करण्याकरिता टँकर देण्यात आला आहे. याबरोबरच कचऱ्याची उचल करण्यासाठी कचरा वाहतूक वाहन देण्यात आले आहे. भविष्यामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघासाठी दोन वाहने उपलब्ध करून देण्यात येतील, असे राहुल जारकीहोळी यांनी सांगितले.
यावेळी मनपा आयुक्त राजश्री जैनापुरे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, प्रदीप एम. जी., किरण साधुण्णावर, किरण पाटील, परशुराम ढगे, अरविंद कारची, आयेशा सनदी, प्रभावती पाटील,नगरसेवक अजिम पटवेगार, आदी उपस्थित होते.