बेळगाव लाईव्ह : नियोजित गळती दुरुस्ती कामासाठी बेळगाव शहरातील विविध भागात ७ फेब्रुवारी रोजी पाणी पुरवठा करण्यात येणार नाही.
काकतीवेस, कंग्राळ गल्ली, भातकांडे गल्ली, कोनवाळ गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, खंजर गल्ली, खडे बाजार, बागवान गल्ली, दरबार गल्ली, कोतवाल गल्ली, शेट्टी गल्ली, बुखारी गल्ली, कसाई गल्ली,
माळी गल्ली, आझाद गल्ली, आझाद गल्ली, भोई गल्ली, बसवाण गल्ली, गणपत गल्ली, चंदू गल्ली, घी गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, मोमीन गल्ली, अशोक नगर,
आझादखान सोसायटी, वीरभद्र नगर, शिवाजी नगर, पंजीबाबा, पोलीस मुख्यालय, सुभाष नगर, अयोध्या नगर, अंजुमन तसेच दक्षिण भागातील आरसी नगर पहिला आणि दुसरा टप्पा आणि परिसर, टिळकवाडी, नानावाडी, वडगाव,
शहापुर, दक्षिण डेमो झोन, हिंदवाडी, मजगाव, ब्रह्मनगर, गोकुळ नगर, हुलबत्ते कॉलनी, एसपीएम रोड, संतसेना रोड, जैन बस्ती, काझी लेन या भागातील पाणी पुरवठ्यात व्यत्यय येणार आहे.
सदर माहिती एल अँड टी कंपनीने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली असून याची दखल घेऊन या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.