बेळगाव लाईव्ह:जय किसान व्होलसेल व्हेजिटेबल मार्केट विरोधात दाखल करण्यात आलेली जनहित याचिका कर्नाटक उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. जनहित याचिका अनेक मुद्द्यांवर अपात्र ठरल्याने न्यायालयाने हा निर्णय दिला.
भारतीय कृषक समाज संयुक्त चे अध्यक्ष सिदगौडा मोदगी आणि इतर पाच जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. बुडा, जिल्हाधिकारी, मनपा, एपीएमसी आणि जय किसान भाजी मार्केट यांच्या विरोधात ही याचिका करण्यात आली होती.
मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे आणि न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांनी याचिका १० जानेवारी रोजी रद्दबातल ठरवली. यासंदर्भात जुन्या याचिकांचा संदर्भ देण्यात आला आहे. यापूर्वी २०१७ मध्ये महम्मद रफिक खानापुरी यांनी दाखल केलेल्या याचिकेचा संदर्भ जोडण्यात आला आहे.
जय किसान ला बांधकामासाठी देण्यात आलेल्या परवान्या संदर्भात प्रश्न विचारण्याचा हक्क न्यायालयाने कुणालाही दिलेला नाही.
आणखी १५ जणांनी सादर केलेल्या याचिकांही यापूर्वी रद्द करण्यात आल्या आहेत.