बेळगाव लाईव्ह : सौंदत्ती यल्लम्मा देवस्थान आणि हुलिगेम्मा या राज्यातील महत्वाच्या धार्मिक स्थळांसाठी विकास प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती धर्मादाय खात्याचे मंत्री रामलिंग रेड्डी यांनी दिली.
कलबुर्गी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी उपरोक्त माहिती दिली आहे. सौंदत्ती यल्लम्मा मंदिर विकास प्राधिकरणाची ८७ एकर क्षेत्र विकसित केले जाणार आहे.
यासाठी निधीची कमतरता नसून ८७ एकर व्यतिरिक्त पर्यटन विभागासाठी अतिरिक्त जमीन संपादित करून विकास करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सौंदत्ती यल्लम्मा प्रमाणेच कोप्पळ जिल्ह्यातील हुलीगी येथील हुलिगेम्मा मंदिराचाही विकास केला जाणार असून त्या मंदिरासाठी विकास प्राधिकरणही स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.