बेळगाव लाईव्ह:हैदराबाद येथून बेळगावला येणाऱ्या एका खाजगी बसला अपघात होऊन 10 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास गंगावती येथील हेमगुड्डा एचआरजी नगर जवळ घडली.
समोरून भरधाव येणाऱ्या बोलेरो वाहनाची धडक टाळण्यासाठी हैदराबादहून बेळगावला येत असलेल्या बसच्या चालकाचे बस वरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
अपघातग्रस्त खाजगी बस मध्ये 40 प्रवासी होते त्यापैकी 10 जणांना गंभीर दुखापत झाली आहे.
जखमींपैकी 8 जणांवर गंगावती सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून इतर दोघांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.