बेळगाव लाईव्ह:सीमाभागात राष्ट्रीय पक्षांना मतदान करून मराठी भाषेचा सन्मान झाला की अपमान झाला? याबद्दल नागरिकांना काय वाटते हे जाणून घेण्यासाठी बेळगाव लाईव्ह ने पोल घेतला होता, ऑनलाईन पोलच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या मतांमध्ये 94% नागरिकांनी आपले मत होय अपमानच झाला… असेच व्यक्त केले आहे.
राष्ट्रीय पक्षांनी मतदानापुरते गोड गुलाबीने वागून त्यानंतर मात्र मराठीवर अन्यायाचे अत्याचाराचे धोरण अवलंबले आहे. असे वास्तव दिसून येते. दरम्यान ऑनलाईन पोलच्या माध्यमातून याबद्दल मते जाणून घेतली असता, होय अपमानच झाला. असे मत 94 टक्के नागरिकांनी व्यक्त केले आहे. सहा टक्के मते ही राष्ट्रीय पक्ष किंवा इतर भाषकांची असण्याची शक्यता आहे. अन्यथा 100% जणांनी होय मराठीचा अपमानच झाला अशा पद्धतीचे मत व्यक्त केल्याचे या पोलमधून दिसते.
एकूण 10000 नागरिकांनी या पोलमध्ये सहभाग घेतला होता. त्यापैकी 94% जणांनी अपमानच होतोय. असे मत व्यक्त केले आहे. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पोल महत्त्वाचा आहे.
सर्वसामान्य जनतेवर राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार थोपवण्यापेक्षा राष्ट्रीय पक्षांच्या किरकोळ आणि काही पातळीवरील मराठी बोलण्याच्या भावनेच्या आहारी जाऊन त्यांना मतदान करण्यापेक्षा महाराष्ट्र एकीकरण समितीने, मराठी माणसाने आपली ताकद दाखवून देण्याची वेळ आहे. असेच या पोलच्या माध्यमातून स्पष्ट झाले आहे.
94 टक्के लोकांची भावना या पोलच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. बेळगाव लाईव्ह ने ऑफलाइन स्वरूपात या संदर्भात कौल घेतला असून वृद्ध, महिला, तरुण आणि सार्वजनिक पातळीवर काम करणाऱ्या गोरगरीब जनतेची मते आजमावून घेतली, यावेळी अनेकांनी राष्ट्रीय पक्षांना मतदान करणे म्हणजे स्वतःचा अपमान स्वतः करवून घेणे आहे. असेच मत बेळगाव लाईव्ह कडे व्यक्त केले आहे.