Thursday, December 26, 2024

/

बेळगावात हरे राम.. हरे कृष्णाचा जयघोष

 belgaum

बेळगाव लाईव्ह :आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) च्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या २६व्या श्री हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवास अभूतपूर्व जल्लोषात शनिवारी दुपारी दीड वाजता धर्मवीर संभाजी चौकातून प्रारंभ झाला. इस्कॉन चे ज्येष्ठ संन्याशी भक्ती रसामृत स्वामी महाराज आणि चैतन्य सुंदर महाराज, मॉरिशस व वृंदावनदास महाराज यांच्या हस्ते रथाची पूजा करून चालना देण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडूसकर, एम. एल. अगरवाल, अरुण कटांबळे, कनुभाई ठक्कर, राजु हत्तरगी यांच्यासह इस्कॉन चळवळीतील अनेक जेष्ठ सदस्य उपस्थित होते.

बेळगाव जिल्हा आणि देशाच्या विविध भागातून आलेले इस्कॉनचे हजारो स्त्री-पुरुष भक्त या रथयात्रेत सहभागी झाले होते या रथयात्रेच्या प्रारंभी बोलताना भक्तीरसामृत स्वामी महाराजांनी सर्वांचे स्वागत केले आणि ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सव हा अनेक वर्षापासून जगभरात सुरु असलेला उत्सव असून तो इतर सर्वसामान्य उत्सवासारखा नाही. शाश्वत राहणाऱ्या या उत्सवात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. “५०० वर्षापूर्वी चैतन्य महाप्रभुंनी या रथयात्रेची सुरुवात केली. ती आता जगभरात आणि बेळगावात ही सुरु आहे अशी माहिती यावेळी वृंदावनदास महाराज यांनी दिली. आज व उद्या इस्कॉन मंदिराच्या पाठीमागे उभारण्यात आलेल्या मंडपात होणाऱ्या विविध सांस्कृतिक व आध्यात्मिक कार्यक्रमाला बेळगावकरांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी केले.

फूलानी सजविलेला रथ व रथामध्ये श्री हरे कृष्ण, राधामैया व गौर निताय यांचे ठेवलेले आर्च विग्रह सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. रथयात्रेच्या निमित्ताने सजविलेल्या होते. दुसऱ्या एका खास रथात इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा पुतळा ठेवलेला होता. रथाला जोडलेले दोरखंड ओढत भक्तगण हा रथ संभाजी चौकातून कॉलेज रोड, समादेवी गल्ली, खडेबाजार गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, रामलिंग खिंड गल्ली, पाटील गल्ली, रेल्वेओव्हर ब्रिजवरून कपिलेश्वर रोडमार्गे खडेबाजार शहापूर, आयुर्वेदिक कॉलेज रोड वरून गोवावेस मार्गे सायंकाळी ०६.३० वाजता टिळकवाडीतील इस्कॉन मंदिराकडे पोहोचला आणि तेथे रथयात्रेची सांगता झाली.Iskcon

रथयात्रेच्या मार्गावर अनेक ठिकाणी रथयात्रेवर पुष्पवृष्टी केली गेली या रथयात्रेच्या अग्रभागी रंगोली काढणारी ५ पथके होती त्यापाठोपाठ शृंगारलेल्या सुमारे २० बैलजोड्या, भजन-कीर्तन मध्ये तल्लीन झालेले हजारो भक्त भगवान श्रीकृष्णाचा नामोच्चार करीत पुढे सरकत होते. भगवान श्रीकृष्णाच्या लीला सादर करणारे अनेक प्रसंग तसेच रामायणातील अनेक प्रसंग विविध गाड्यांवर सादर केले जात होते. ढोल वाजवणारे पथक व हंदीगनुरच्या ज्ञानेश्वर भजनी मंडळीचे भजन सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. आज देशाच्या विविध भागात रथयात्रा होत असली तरीही इस्कॉन मध्ये बेळगावच्या रथयात्रेला विशेष महत्त्व आहे. अभूतपूर्व उत्साह असलेली ही रथयात्रा म्हणजे जनतेला दर्शन देण्यासाठी साक्षात भगवंतच रस्त्यावर उतरलेले होते.Iskcon bgm

ठिकठिकाणी फळे, सरबत, लाडु व पाणी वितरण केले जात होते. सायंकाळी इस्कॉन मंदिराच्या पाठीमागच्या बाजूस उभारलेल्या विविध स्टॉल्सवर खाद्यपदार्थांची व इस्कॉनच्या विविध उपक्रमांची माहिती देणारे स्टॉल उभारण्यात आले आहेत.

इस्कॉन मंदिरात विविध कार्यक्रम

शनिवारी सकाळी रोजच्या प्रमाणे गौर आरती, भजन व किर्तन झाले. त्यानंतर प.पू. सुंदर चैतन्य स्वामी महाराज यांचे श्री जगन्नाथाष्टकम् वर प्रवचन झाले. भगवान श्रीकृष्णाच्या बासरी वादनाला विशेष अर्थ आहे. त्यांच्या प्रत्येक स्वरातून विविध अर्थ निघतात असे सांगून बद्रीनाथ, रामेश्वर, द्वारका व जगन्नाथ पुरी या चार धामापैकी जगन्नाथ पुरी धाम अत्यंत महत्वाचे आहे असे चैतन्य स्वामी महाराज यांनी सांगीतले त्यांचे स्वागत गोलोकचंद्र प्रभु यांनी केले.Iskcon bgm

भजन, प्रवचन, कीर्तन आणि ज्येष्ठ संन्याशांची प्रवचने व नाट्य लीला झाली त्यानंतर सर्वांसाठी महाप्रसाद झाला. रविवार दि. ११ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४ नंतर वैष्णव यज्ञ व इतर उपक्रम होतील तसेच रात्री सर्वांना महाप्रसाद होईल. या सर्व उपक्रमात जनतेने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन इस्कॉन चे अध्यक्ष परमपूज्य भक्ती रसामृत स्वामी महाराज यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.