बेळगाव लाईव्ह :बसवन गल्ली गॅस दुर्घटनेतील आणखी एका जखमीचा बुधवारी खासगी इस्पितळात मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृतांचा आकडा ३ वर पोहोचला आहे.
खडेबाजार पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. गोपालकृष्ण सीताराम भट (वय ८४) असे त्या दुर्दैवी वृद्धाचे नाव आहे. रविवार दि. २८ जानेवारी रोजी सायंकाळी रेग्युलेटर व्यवस्थित न बसविल्यामुळे सिलिंडरमधून गॅसची गळती होऊन आगीचा भडका उडाला होता.
या घटनेत एकाच कुटुंबातील पाचजण जखमी झाले होते. दुसऱ्या दिवशी सोमवार दि. २९ जानेवारी रोजी गोपालकृष्ण यांची पत्नी कमलाक्षी भट (वय ७६) व नातू हेमंत मोहन भट (वय २७) या दोघा जणांचा मृत्यू झाला होता.
आजी व नातवापाठोपाठ आजोबाचाही मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील आणखी दोघा जखमींवर उपचार करण्यात येत आहेत.