Monday, December 30, 2024

/

जिजाऊ ब्रिगेडचा अधिकार ग्रहण, तिळगुळ समारंभ उत्साहात

 belgaum

बेळगाव लाईव्ह:मराठा सह बारा बलुतेदार समाजातील महिलांना स्वतंत्र असं व्यासपीठ बेळगावमध्ये अद्यापही उपलब्ध नव्हतं. त्यामुळे महिलांच्या अंगभूत कला कौशल्यांचा कोंडमारा होत होता. त्या महिलांना आपले कला कौशल्य सादर करता यावे याकरिता आम्ही हे जिजाऊ महिला ब्रिगेड व्यासपीठ निर्माण केले आहे असे मत डॉ सोनाली सरनोबत यांनी व्यक्त केले.

बेळगाव शहरातील राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे आयोजित अधिकार ग्रहण आणि तिळगुळ समारंभ आज गुरुवारी दुपारी तुकाराम महाराज हॉल ओरिएंटल हायस्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडला त्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून त्या बोलत होत्या.

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या चेअरमन डॉ. सोनाली सरनोबत यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या समारंभास प्रमुख वक्त्या म्हणून सुनिता पाटणकर आणि मनीषा नेसरकर या उपस्थित होत्या.

ईशस्तवन आणि स्वागत गीताने समारंभाची सुरुवात झाली त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्याबरोबरच दीपप्रज्वलन करण्याद्वारे समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठानची शाखा असलेल्या जिजाऊ ब्रिगेडची जिल्ह्यात विविध पाच ठिकाणी स्थापना करण्यात आली असून या ब्रिगेडच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांचा अधिकार ग्रहण कार्यक्रम यावेळी पार पडला. सदर पदाधिकाऱ्यांचा मानपत्र देऊन प्रमुख वक्त्या सुनिता पाटणकर व मनीषा नेसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

समारंभात प्रमुख व्यक्तींनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले त्यानंतर डॉ. सोनाली सरनोबत यांचे समायोचित असे मार्गदर्शनपर अध्यक्षीय भाषणात सरनोबत पुढे म्हणाल्या की जिजाऊ ब्रिगेडबद्दल माहिती देताना त्या म्हणाल्या की, दोन दशकांपूर्वी जिजाऊ ब्रिगेड ही संस्था अत्यंत साधेपणाने सुरू करण्यात आली होती. गेल्या 24 वर्षांपूर्वी स्थापना झालेल्या या संघटनेला मूर्त स्वरूप यावर्षी येत आहे. जिजाऊ ब्रिगेड आता ‘ब्रिगेड’ म्हटलं की काःही जणांच्या काळजाचा ठोका चुकतो. मात्र तसे कांही नाही. ब्रिगेड याचा अर्थ सर्वसमावेशक असा होतो. तो उद्देश जिजाऊ ब्रिगेडचा आहे.Jijau brigade

राजमाता जिजाऊ सांस्कृतिक प्रतिष्ठान या लांबलचक नावाचे जिजाऊ ब्रिगेड हे संक्षिप्त स्वरूप आहे. गेल्या वर्षभरात बेळगावमध्ये महिलांच्या बाबतीत अतिशय दुर्दैवी निंद्य घटना घडल्या आहेत. तेंव्हा आपण अशा अन्यायग्रस्त पीडित महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचारापैकी कांही मोजक्याच घटना उजेडात येतात. आज घरगुती हिंसाचाराचा बळी ठरणाऱ्या महिला असंख्य आहेत. अशा महिला स्वतःच्या आणि घराच्या इभ्रतीपोटी कोणाकडे आपल्यावरील अत्याचाराची वाच्यता करत नाही. वाच्यता केलीच तर ती आपल्या विश्वासू मैत्रिणीकडे करतात. त्या मैत्रिणी जर आम्हाला येऊन सांगितले तर चारचौघात बोभाटा न करता, त्या महिलेच्या चारित्र्यावर कोणतेही शिंतोडे न उडवता, शांतपणे त्या महिलेच्या घरी जाऊन त्या हिंसाचाराला आपण जर आळा शकू तर त्याच्यासारखी दुसरी चांगली गोष्ट नाही. स्त्री सक्षमता म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारणे नव्हे. आज एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभे राहू लागली, सक्षम होऊ लागली तर आपणच तिच्याबद्दल नको ते बोलत असतो. ही गोष्ट थांबली पाहिजे. आपल्या मैत्रिणीच्या चारित्र्यावर शिंतोडे उडत असताना आपण त्या गॉसिपमध्ये भर न घालता आपल्या मैत्रिणीचे आपण कसे संरक्षण करू शकतो, तिच्या बाजूने कसे सक्षम उभे राहू याचा विचार केला पाहिजे असे सांगून आज आपल्या सुनेच्या मागे कंबर खोचून उभी राहिलेली सासू आपण बघत नाही. तेंव्हा तुम्ही आणि मी तशी सासू होऊया. आपण हा पायंडा पाडूया. आपण आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहूया, असे डॉ. सरनोबत म्हणाल्या.

व्यासपीठावरील मान्यवरांनी समवेचित विचार व्यक्त केल्यानंतर तिळगुळ समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सदर समारंभामध्ये नम्रता हुंदरे, मंगल पाटील, दिपाली मलकारी, कांचन चौगुले, लक्ष्मी गोंडाडकर, स्वाती फडके, गीता चौगुले, चंद्रा चोपडे, वृषाली मोरे, आशाराणी निंबाळकर, निशिता कदम, नीना काकतकर आदींसह बहुसंख्य महिलांचा सहभाग होता.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.