जलजीवनची कामे तातडीने पूर्ण करा
जि. पं. सीईओ राहुल शिंदे : जिल्हा पंचायत सभाबेळगाव लाईव्ह :जलजीवन मिशनची कामे तातडीने पूर्ण करावीत. पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही, याची दक्षत घ्यावी, असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल शिंदे यांनी सांगितले.
शनिवारी (दि.20) जिल्हा पंचायत सभागृहात बेळगाव आणि चिकोडी विभागाच्या ग्रामीण भागातील पिण्याचे पाणी व स्वच्छता विभागाच्या विकास आढावा बैठकीत अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
बेळगाव विभागांतर्गत 4 नवीन बहुग्राम पाणी पुरवठा प्रकल्प असून वनखात्याच्या अडचणी तातडीने दूर करून कामे सुरू करण्याकडे त्यांनी लक्ष वेधले. उन्हाळ्यात गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी कार्यवाही करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. दोन्ही विभागातील गावपातळीवरील ओव्हरहेड पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची महिन्यातून एकदा स्वच्छता करावी. याकामी प्रभारी सहाय्यक कार्यकारी अभियंत्यानी यांनी लक्ष घालावे, अशी सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा पंचायत योजना संचालक रवी बंगरेप्पनवर, कार्यकारी अभियंता, सहायक कार्यकारी अभियंता आदी उपस्थित होते
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
अल्पसंख्याक गटांच्या कल्याणासाठी पंतप्रधानांच्या 15 नवीन सूत्री कार्यक्रमांची पुरेशी अंमलबजावणी झाली पाहिजे. सबब न दाखवता विनिर्दिष्ट कालावधीत लक्ष्य गाठले पाहिजे. जिल्हाधिकारी नितेश पाटील म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाला शिक्षण, कौशल्य आणि इतर नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले पाहिजे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शनिवारी (दि. 20) पंतप्रधानांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाच्या अंमलबजावणी प्रगती आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
उद्यान विभागाकडून विविध योजनांचा पुरेसा वापर केला जात नाही. प्रकल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही. याकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये. बेळगाव उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आसिफ (राजू) सेठ यांनी निर्धारित कालावधीत उद्दिष्ट गाठावे, अशी सूचना केली. मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, अल्पसंख्याकांच्या लाभार्थ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाकडून जाळी व इतर आवश्यक उपकरणे पुरविण्यात आली असून त्याची माहिती विभागीय संकेतस्थळांवरही प्रसिद्ध करण्यात आली आहे.