Monday, December 23, 2024

/

जिल्हाधिकारी कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी एका युवकाने फिनाईल पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज बुधवारी घडली.

आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या युवकाचे नांव कुमार कुप्पद (वय 23) असे असून तो गोकाक तालुक्यातील लग्मेश्वर गावचा रहिवासी आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी एक युवक विषारी फिनाईल पिऊन स्वतःला संपवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

तसेच कुमार याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. त्याने आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचे निश्चित कारण उशिरापर्यंत समजू शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.