Sunday, January 12, 2025

/

अंतिम मतदार यादी जाहीर; जिल्ह्यात 40.37 लाख मतदार

 belgaum

बेळगाव लाईव्ह :यंदा होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी काल सोमवारी जाहीर केली असून त्यानुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या 40 लाख 37 हजार 274 इतकी आहे. यामध्ये 2 लाख 25 हजार 471 पुरुष, 2 लाख 11 हजार 636 महिला तर 168 इतकी तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे.

गेल्या डिसेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील तत्कालीक मतदार यादीमध्ये आता नव्याने 58,449 मतदारांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे तत्कालीक मतदार यादीत नवमतदारांची संख्या 51 हजार 159 इतकी होती ती आता दुपटीने वाढवून तब्बल 1 लाख 2 हजार 706 इतकी झाली आहे.

तत्कालीक यादीत पुरुष मतदारांची संख्या 20 लाख 5 हजार 3 इतकी आणि महिला मतदारांची संख्या 19 लाख 73 हजार 668 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 155 इतकी होती. आता अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यातील पुरुष मतदारांची संख्या 20 लाख 25 हजार 471 इतकी आणि महिला मतदारांची संख्या 20 लाख 11 हजार 636 तर तृतीयपंथी मतदारांची संख्या 168 इतकी झाली आहे.

मतदारांची संख्या जाहीर करण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या 4524 इतकी असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये शहरी भागातील 1324 आणि ग्रामीण भागातील 3200 मतदान केंद्रांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या (अनुक्रमे मतदार संघ, पुरुष मतदार, स्त्री मतदार, तृतीयपंथीय, एकूण यानुसार) पुढील प्रमाणे आहे. निपाणी : 115645, 115069, 12, 230726. चिकोडी सदलगा : 114437, 114619, 10, 229066. अथणी : 119303, 115449, 5, 234757. कागवाड : 102369, 99836, 7, 202212. रायबाग : 101836, 97653, 14, 199503. कुडची : 110677, 106132, 8, 216817.

हुक्केरी : 105091, 106244, 10, 211345. आरभावी : 127376, 127220, 9, 254605. गोकाक : 126414, 130478, 19, 256911. यमकनमर्डी : 102126, 103881, 9, 206016. बेळगाव उत्तर : 126800, 131606, 16, 258422. बेळगाव दक्षिण : 126468, 126204, 12, 252684. बेळगाव ग्रामीण : 131813, 130766, 10, 262589. खानापूर : 111424, 105674, 5, 217103. कित्तूर : 99709, 98607, 5, 198321. बैलहोंगल : 97909, 98630, 2, 196541. सौंदत्ती : 101123, 101197, 4, 202324. रामदुर्ग : 104151, 102371, 11, 207333.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.