बेळगाव लाईव्ह:जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीतही आहे. ती 22 जानेवारी रोजी उपलब्ध करून देण्यात आली आहे.ऑनलाईनही नाव तपासणी करता येते, अशी माहिती जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी दिली आहे.
बेळगाव जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेली अंतिम मतदार यादी मराठीत नाही, अशी चुकीची माहिती काही जणांना मिळाली होती. त्यामुळे काहींनी याबाबत मुख्य निवडणूक आयोगाकडे मराठी मतदार यादी देण्याची मागणी केली होती.
याबाबत जिल्हाधिकारी नितेश पाटील यांना माहिती मिळताच, त्यांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा केली व मराठीत मतदार यादी याआधीच जाहीर करण्यात आली आहे असे सांगितले ती ऑनलाईनही उपलब्ध आहे, अशी माहिती दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेळगाव जिल्ह्यातील सर्व मतदार संघातील मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीची तयारी जिल्हा प्रशासनाने चालवली आहे.