Saturday, November 30, 2024

/

उद्यमबाग तेथे बँकेची भिंत फोडून चोरीचा प्रयत्न

 belgaum

बेळगाव लाईव्ह :चोरट्यांनी काल रात्री उद्यमबाग येथील एका बँकेच्या शाखेमध्ये तसेच दोन छोट्या कारखान्यांमध्ये चोरीचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज रविवारी सकाळी उघडकीस आला.

उद्यमबाग येथील बेम्को सर्कलपासून कांही अंतरावर असलेल्या युनियन बँकेमध्ये काल रात्री चोरीचा प्रयत्न झाला. बँकेत चोरी करण्याच्या उद्देशाने चोरट्यांनी चक्क बँक इमारतीची मागील भिंत फोडल्याचे आज सकाळी निदर्शनास आले.

याखेरीज चोरट्यांनी जवळच्या दोन कारखान्यांच्या दरवाजांचे कडी कोयंडे तोडून तेथे देखील चोरीचा प्रयत्न केल्याचे दिसून आले.

अयशस्वी चोरीचा हा प्रकार आज सकाळी परिसरात चर्चेचा विषय झाला होता. त्याचप्रमाणे सदर प्रकारामुळे चिंतीत झालेल्या परिसरातील लघुउद्योजकांकडून रात्रीची पोलीस गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.