बेळगाव लाईव्ह : बेळगावात स्मार्ट सिटी योजना राबवली गेली खरी मात्र स्वच्छतेच्या बाबतीत यावर्षीही रँकिंग मध्ये घसरण झाली आहे.
स्वच्छ सर्वेक्षण 2023 मध्ये बेळगाव 198 व्या स्थानावर आले आहे.
बेळगावने स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १९८ वे स्थान प्राप्त केले आहे, गेल्या वर्षीच्या १७१व्या क्रमांकाच्या तुलनेत यंदा ही वर्णी लागली आहे.
बेळगाव मनपाच्या (Belagavi (M CORP. + OG)) क्रमवारीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. सध्या, 1 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या श्रेणीतील 446 शहरांपैकी 198 वे स्थान आहे, तर राज्यात 7 वा क्रमांक मिळवला आहे.
2023 च्या स्वच्छ भारत सर्वेक्षणामध्ये, 9500 गुणांच्या स्केलवर मूल्यांकन करण्यात आले होते, बेळगाव (M.Corp+OG) 4830 गुण मिळवण्यात यशस्वी झाले. तथापि, गेल्या वर्षीच्या तुलनेत, 2022 मध्ये शहराची मागील 171 क्रमांकावरून 27 स्थानांनी घसरण झाली आहे.