बेळगाव लाईव्ह :बेळगावातील मराठी भाषा, मराठीपण, मराठी बाणा आणि मराठी संस्कृतीवर गेले कित्येक वर्षात नेहमीच घाला घालण्यात आला आहे. नेहमीच टाच येत राहिली आहे. कर्नाटक सरकार मध्ये दुय्यम स्थान…. कन्नड भाषेच्या बरोबरीने स्थान न मिळता मराठीला सापत्नभाव…. हे सारे ठरलेले आहे.
मराठी फलक लावले, मराठीत बोलले किंवा मराठीत वागले तरी अपमानाची वागणूक मिळते….. अशा पद्धतीच्या वातावरणात नेमके जगायचे कसे? हा बेळगावच्या मराठी माणसासमोरील प्रश्न आहे. अशा परिस्थितीत बेळगाव मराठीचा रक्षणकर्ता म्हणून कोण अपेक्षित आहे? असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतो.
बेळगावकर मराठीचा रक्षणकर्ता म्हणून कोणाला बघतो? फक्त बेळगावात नव्हे तर संपूर्ण सीमाभागात मराठीचा रक्षणकर्ता म्हणून आपण कुणाला बघता हा प्रश्न नेहमीच उपस्थित होतो…. बेळगाव लाईव्ह ने सर्वसामान्य नागरिकांना मराठीचा रक्षणकर्ता म्हणून कोणाला मत द्यायचे आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
बेळगाव live ने यासंदर्भात एक पोल जारी केला आणि या माध्यमातून बेळगावकर मराठी रक्षणकर्ता म्हणून कोणाला बघतात? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले, पहिला पर्याय होता महाराष्ट्र एकीकरण समिती, दुसरा पर्याय काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष, तिसरा पर्याय भाजप आणि चौथा पर्याय स्वतः मराठी माणूस.
या पोलला उत्तर देण्याची मुदत आहे 31 जानेवारी पर्यंत आणि आत्ताच उपलब्ध झालेल्या मतांमध्ये स्वतः मराठी माणूसच बेळगावात मराठीचा रक्षण करत आहे. असे मत व्यक्त करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.
अंतिम रिझल्ट नक्कीच बेळगाव live जाहीर करणार आहे, मात्र 31 जानेवारीपर्यंत जास्तीत जास्त लोकांनी या पोलमध्ये आपले मत व्यक्त करण्याची गरज आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत आणि या निवडणुका जवळ आल्यानंतर मराठीचा पुळका घेऊन पुढे येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. स्वतःच्या संस्था वाचवण्यासाठी काही पुढारी सामान्य नागरिकांना मामा करून राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला संपूर्ण समाज बांधण्याच्या तयारीत असल्याचेही दिसून येत आहे. या साऱ्या परिस्थितीत बेळगावात मराठीचे रक्षण होणे गरजेचे आहे. बेळगावात मराठीचे रक्षण करणे कुणाच्या हातात आहे? हे कुठला पुढारी, कुठला नेता ठरवणार नाही, तर स्वतः मराठी माणूस ठरवणार आहे. त्यामुळे मराठी माणसांनी बेळगाव लाईव्ह च्या या पोल ला उत्तमरीत्या प्रतिसाद देण्याची सध्या गरज बनली.
हा पोल बेळगावच्या नागरिकांचे नेमके मत काय हे सांगणार आहे. यातून नागरिकांना राष्ट्रीय पक्षांवर विश्वास आहे? महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेते मंडळींवर विश्वास आहे? की स्वतःवर विश्वास आहे? हे ठरणार आहे. यामुळेच आता या पोलला जास्तीत जास्त नागरिकांनी प्रतिसाद द्यावा. असे आवाहन करण्यात येत आहे.
बेळगावात मराठीचा रक्षणकर्ता म्हणून कुणाला बघता?
https://pollie.app/h832t
Click a link to vote:
महाराष्ट्र एकीकरण समिती
👉 https://pollie.app/6rp1n
काँग्रेस
👉 https://pollie.app/f70lu
भाजप
👉 https://pollie.app/2t0do
स्वतः मराठी माणूस
👉 https://pollie.app/nfb2g