Sunday, January 26, 2025

/

जखमी भिक्षुकाच्या मदतीला धावले सामाजिक कार्यकर्ते

 belgaum

बेळगाव लाईव्ह:  बेळगाव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथील दुसऱ्या बसथांब्या जवळ रस्त्याशेजारी पायाला जखम झाल्याने असहाय्य अवस्थेत पडून असलेल्या एका भिक्षुकाच्या मदतीला धावून जात सामाजिक कार्यकर्त्यांनी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याची माणुसकीचे दर्शन घडवणारी घटना आज बुधवारी सकाळी घडली.

याबाबतची थोडक्यात माहिती अशी की, ध. संभाजी महाराज चौक येथे असलेल्या शहर बस सेवेच्या थांब्यांपैकी दुसऱ्या थांब्याजवळ एक भिक्षुक इसम गेल्या कांही दिवसांपासून रस्त्याकडेला पडून होता.

आज याबाबतची माहिती मिळताच श्रीराम सेना, यंग बेळगाव फाउंडेशन आणि फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे कार्यकर्ते तात्काळ त्या बस स्थानकाच्या ठिकाणी दाखल झाले. तसेच त्यांनी त्या भिक्षुक इसमाची विचारपूस केली.Allan

 belgaum

त्यावेळी पायाला झालेल्या जखमांमध्ये अळ्या पडून त्याची अवस्था चिंताजनक झाल्याचे कार्यकर्त्यांच्या निदर्शनास आले. तेंव्हा त्यांनी वेळ न दवडता रुग्णवाहिका मागवली. त्यानंतर स्थानिक पोलिसांचे सहकार्य घेत समन्वयाने त्या भिक्षुकाला रुग्णवाहिकेतून त्वरेने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची व्यवस्था केली.

सदर निस्वार्थ मदत कार्यात नारू निलजकर, अवधूत तुडवेकर, ॲलन विजय मोरे, संतोष दरेकर, भारत पाटील निलजी आणि सुरज धर्मोजी यांचा सहभाग होता. या सर्व कार्यकर्त्यांनी माणुसकी जपत संबंधित असहाय्य भिक्षुकाला केलेल्या मदतीची बस थांब्याच्या ठिकाणी उभे असलेले प्रवासी आणि ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये प्रशंसा होत होती.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.