बेळगाव लाईव्ह :बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने विविध विकास कामांसाठी नव्याने निविदा काढल्या आहेत. सदर निविदा खालील विकास कामांसाठी काढण्यात आल्या आहेत.
बेळगावातील काकती येथे वॉटर किऑक्स खरेदी आणि स्थापना (02 नग) आणि 01 बस निवारा बांधणे -31,42,531.66. काकती, बेळगाव येथे रस्ते, ड्रेनेज आणि पथदिपांच्या थांबांचा विकास
-1,05,97,750.16. विजयनगर बेळगाव येथे ड्रेनेज, पथदिपांच्या खांब्यांसह पेव्हर ब्लॉक रस्त्याचा विकास -1,63,21,876.64 (यामध्ये पेव्हर ब्लॉक रस्ते
आणि वादळी पाण्याचा निचरा व पुरवठा या सहयोगी कामाचा समावेश आहे). शिवबसवनगर, बेळगाव येथील रस्त्यांचा विकास आणि इतर विकास कामे – 1,62,99,630.96.