बेळगाव लाईव्ह:बेळगावातील किल्ला तलाव परिसरात प्रेमी युगल असल्याचे समजून भाऊ बहिणीचे अपहरण करून त्यांच्यावर त्यांच्यावर हल्ला केलेल्या 18 जणांवर बेळगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून यातील सात जणांना अटक केली आहे.
शनिवारी सायंकाळी बेळगाव शहरातील किल्ला तलाव परिसरातील गार्डनमध्ये सचिन लमाणी आणि मुस्कान नावाची भाऊ बहीण बोलत बसले असता एका सतरा जणांच्या टोळक्याने त्यांचे अपहरण करून किल्ला तलाव परिसरातील एका शेडमध्ये नेऊन मारहाण केल्याची घटना घडली होती.
रविवारी सकाळी भाजप ज्येष्ठ भाजप नेते केएस ईश्वराप्पा यांनी बेळगाव जिल्हा सिविल स्पीकर सचिन लमानी या युवकाची विचारपूस करून तब्येतीची चौकशी केली या मारहाण प्रकरणातील आरोपीवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली.
डी सी पी रोहन माध्यमांशी बोलताना सांगितले की शनिवारी किल्ला तलावाजवळ ही घटना घडली होती मार्केट पोलिसांनी तपास करून मारहाण केलेल्या नऊ जणांना अटक केली असून त्यापैकी दोघेजण अल्पवयीन असल्याचे त्यांनी सांगितले.शहरात अश्या कोणत्याही घटना घडल्यास कुणाचाही मुलाहिजा न करता कारवाई करत असल्याचे देखील डी सी पी जगदीश यांनी नमूद केले आहे.
किल्ला तलावाजवळील गार्डन जवळ अर्धवट बांधकाम केलेले शेड आहे त्या शेड मध्ये दोघांना नेऊन मारहाण करण्यात आली होती त्याची घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे अर्धवट बांधकाम असलेले शेडचे काम पूर्ण करा असे पत्र महापालिका प्रशासनाला लिहिणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मोहम्मद, आतिफ, मोहम्मद अमान, सैफुल्ला, रीहान, उमर सादिक, आझान अबिदान अश्या मुख्य आरोपी असलेल्यां अटक झाली असून जवळचे सर्व सीसीटिव्ही तपासून आणखी कुणी असेल तर त्यांच्यावर देखील कारवाई केली जाणार आहे अशी माहिती रोहन जगदीश यांनी दिली.