बेळगाव लाईव्ह :सार्वजनिक वाचनालय बेळगावच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्या बुधवार दि. 3 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता “मी सावित्री ज्योतिराव फुले” या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे.
महात्मा फुले रोड, शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे हा एकपात्री प्रयोग होणार आहे. सदर प्रयोग साताऱ्याच्या प्राध्यापिका कविता म्हेत्रे या सादर करणार आहेत. मूळच्या सातारा जिल्ह्यातील म्हसवड (ता. माण) येथील असलेल्या प्रा. कविता निवृत्ती म्हेत्रे यांनी एमएससी (केमिस्ट्री) व एमए (मराठी) पदवी संपादन केली आहे.
पत्रकारितेमधील मास्टर ऑफ जर्नालिझम पदवी प्राप्त केलेल्या प्रा. कविता म्हेत्रे यांनी राजकीय क्षेत्रात सुद्धा आपला वेगळा ठसा उमटविला आहे. पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष आणि सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला आघाडी कार्याध्यक्ष या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
याखेरीज म्हसवड येथील सर्वोदय सामाजिक संस्था व सर्वोदय वाचनालय या सामाजिक संस्थांमध्ये अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. आतापर्यंत त्यांना आदर्श जिल्हा युवा पुरस्कार,
1काआदर्श शिक्षक गौरव पुरस्कार, आदर्श महिला पुरस्कार, ओबीसी रत्न पुरस्कार, आदर्श कार्यकर्ती जिल्हास्तरीय पुरस्कार, यशवंत गौरव पश्चिम महाराष्ट्र पुरस्कार, क्रांतीज्योती गौरव पुरस्कार अशा विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्रा कविता म्हेत्रे यांचे आत्तापर्यंत सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित अनेक एकपात्री प्रयोग सादर झाले आहेत.
Very nice 👍