Sunday, December 22, 2024

/

चार वर्षात जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले

 belgaum

बेळगाव लाईव्ह : गेल्या चार वर्षात जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढले आहे. या काळात बेळगाव शहरासह जिल्ह्यात ९,२८७ अपघात झाले असून त्यात ३, ३५८ जणांना प्राण गमवावे लागले आहेत.

तर १२,४५७ लोक जखमी झाले आहेत. रहदारी नियमांचे उल्लघंन करण्याऱ्या वाहनचालकांवर पोलिस दंडात्मक कारवाईसह जनजागृती करत असले तरी नियम मोडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.

जिल्ह्यात २०२० मध्ये २,०२२ अपघातांत ७५४, २०२१ मध्ये २१२१ अपघातांत ७९३, २०२२ मध्ये २,५०१ अपघातांत ९११ तर २०२३ मध्ये २,६४२ अपघातांत ८९० जणांचा मृत्यू झाला. त्यानुसार चार वर्षांत ९,२८७ अपघातांत ३, ३५८ लोकांचा मृत्यू झाला असून १२,४५७ लोक जखमी झाले. जिल्हा पोलिस मुख्यालय कार्यक्षेत्रात ७,३२३ अपघातांत २,८३६ तर शहर पोलिस आयुक्तालय
अखत्यारीत १,९६४ अपघातांत ५२२ जणांचा मृत्यू झाला आहे.

अपघातांच्या नोंदीनुसार जिल्ह्यात जखमी आणि अवयव गमावण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यापैकी बहुतेक दुचाकीस्वार आहेत. हेल्मेट परिधान न करणे, रहदारी नियमांचे उल्लंघन ही अपघाताची प्रमुख कारणे असल्याचे आढळून आले. लोकांसमोर पोलिस आदर्श ठरले पाहिजेत अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भावना आहे. त्यामुळे, विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या एका पोलिसाला जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी अलीकडेच निलंबित केले आहे. दुसरीकडे वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणाऱ्या पोलिसांना राजकारणी आणि इतर अधिकारी फोन करुन त्रास देतात. ग्रामीण भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था बनल्यानेही अपघातांची संख्या वाढत आहे. कारणी

66 रहदारी व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी पोलिस प्रयत्नशील आहेत. केवळ दंड वसूल करण्यापुरतेच पोलिसांचे कार्य मर्यादित नसून शाळा-महाविद्यालयांत जागृतीही केली जात आहे. लोकांना रहदारी नियमांचे पालन करण्यासह सहकार्य केले पाहिजे असे आवाहन पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.