बेळगाव लाईव्ह : कर्नाटकासह महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री रेणुका देवी यात्रेच्या निमित्ताने
देवस्थानाला भेट देणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत शाकंभरी पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून बेळगाव-सौंदत्ती मार्गावर जादा बस धावणार आहेत. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्याचा निर्णय परिवहनने घेतला आहे.
मध्यवर्ती बसस्थानकातून सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही विशेष बससेवा सुरू राहणार आहे. शाकंभरी पौर्णिमेसाठी यल्लम्मा यात्रेनिमित्त सौंदत्तीला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे.
या पार्श्वभूमीवर 22 ते 31 जानेवारी दरम्यान परिवहनमार्फत 30 जादा बस सोडल्या जाणार आहेत. विशेषत: शक्ती योजनेंतर्गत महिलांचा मोफत प्रवास होणार आहे.