बेळगाव लाईव्ह :डी के शिवकुमार हे दररोज प्रशासन कार्यात मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करत आहेत. दिननित्य सिद्धरामय्या यांच्या कामात त्यांचा हस्तक्षेप सुरू आहे हाय कमांडच्या माध्यमातून त्यांच्यावर दबावतंत्र वापरण्यात येत आहे. ते एक चांगले प्रशासक आणि उत्तम मुख्यमंत्री आहेत मी त्यांच्या काळात मंत्री म्हणून काम केले आहे त्यांना मोकळ सोडल्यास ते चांगलं काम करून दाखवतील मात्र शिवकुमार आणि कंपनीचा हाय कमांड वर मोठा प्रभाव आहे त्यामुळे त्यांचा हस्तक्षेप वाढला आहे असा आरोप माजी मंत्री रमेशजारकी होळी यांनी केला आहे.
बेळगाव जिल्ह्यातील कागवाड येथे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.2013 ते 2017 पर्यंतचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आता का दिसत नाही त्यांच्यावर दबाव आहे. सिद्धरामय्या मुख्यमंत्री झालेत म्हणून ठीक आहे अन्यथा जर बेळगावची विष कन्या आणि उपमुख्यमंत्री असलेले डी के जर का मुख्यमंत्री झाले असले सगळ्या कॉम्पुटर उताऱ्यावर त्यांचीच नाव झळकली असती अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
सिद्धरामय्या आजही आमचे नेतेच आहेत माझ्यावर एक केस घातली म्हणून काही बिगडत नाही 420 केस घालून ‘टीव्ही वर नाव आले बातमी आली म्हणून आसुरी आनंद व्यक्त करू देत’असा खुश होऊ देत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.यापूर्वी डी के सुकुमार सीडी प्रकरणांमध्ये मला मोठी शिक्षा करणार होते ते फसलं आता 420 केस घालून काय करणार आहेत ? असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
उमेश कत्ती हेच डीसीसी बँकेचे अध्यक्ष म्हणून पुढेही राहतील असा विश्वास व्यक्त करत राज्यसभा सदस्यांना कडाडीआणि लोकसभा सदस्य अण्णासाहेब जोल्ले हे दोघेजण डी सी सी बँकेचे राजकारणात हस्तक्षेप करतायेत त्यावर तुमचे मत काय आहे असे विचारले असता त्यांनी रमेश कत्ती यांना आपली पसंती दिली आहे.
भाजपा प्रदेश अध्यक्षपद देण्यामध्ये उत्तर कर्नाटकावर अन्याय झालाय का असा प्रश्न विचारला असता त्यांनी मी संपूर्ण कर्नाटकाचा पुरस्कार करणारा आहे त्यामुळे उत्तरं दक्षिण काय वेगळं नाहीये. कर्नाटक राज्याचा व्यक्तीलाच अध्यक्ष पद दिलेलेआहे त्यामुळे पुढील वेळी उत्तर कर्नाटकला मिळेल का बघूया. उत्तर आणि दक्षिण हा महत्त्वाचा प्रश्न नाही असेही त्यांनी सांगितले.