Monday, January 27, 2025

/

प्लास्टिक मिश्रित रस्ता डांबरीकरण प्रकल्पाचा शुभारंभ

 belgaum

बेळगाव लाईव्ह :प्लास्टिक पावडर मिश्रित डांबरी रस्ते तयार करण्याचा पर्यावरण पूरक असा राज्यातील पहिला प्रकल्प बेळगाव महापालिकेने सुरू केला असून त्याचे उद्घाटन आज मंगळवारी राज्याचे नगर प्रशासन मंत्री रहीम खान व सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते झाले.

नगर प्रशासन मंत्री रहीम खान आणि सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या पुढाकाराने बेळगाव शहरातील पर्यावरण पूरक अशा प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर करून रस्ते बनविण्याच्या राज्यातील पहिल्या योजनेला आज चालना देण्यात आली.

मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजनासह यंत्र पूजा करून प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्त्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत प्लास्टिक कचऱ्याचे पावडरमध्ये रूपांतर करून ती पावडर रस्त्याच्या डांबरीकरणांमध्ये वापरली जाणार आहे. यापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर महापालिकेसमोरील रस्त्याचे प्लास्टिक मिश्रित डांबरीकरण करण्यात आले आहे.Plastic mixing road

 belgaum

यावेळी बोलताना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी पर्यावरण पूरक दीर्घकाळ टिकाऊ अशा प्लास्टिक मिश्रित डांबरी रस्त्याचे महत्त्व विशद केले. परदेशात अशा प्लास्टिक रस्त्यांची चांचणी यशस्वी झाल्याचे सांगून बेळगावात आजपासून या पद्धतीने रस्त्यांचे डांबरीकरण सुरू करण्यात आले आहे.

आता भविष्यात माझ्या खात्याकडून त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच महापौर व उपमहापौरांकडून आपत्कालीन निधीचा गैर वापर झाल्याची माहिती कानावर आली असून त्यावर चर्चा करणार असल्याचे मंत्री जारकीहोळी यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी महापौर शोभा सोमनाचे, उपमहापौर रेश्मा पाटील, जिल्हाधिकारी नितेश पाटील, मनपा आयुक्त अशोक दूडगुंटी, जिल्हा पोलीस प्रमुख डाॅ. भीमाशंकर गुळेद, मनपा अधिकारी, सत्ताधारी व विरोधी गटाचे नगरसेवक, नगरसेविका आणि नागरिक उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.