बेळगाव लाईव्ह: बेळगाव विमान तळाची प्रगती दिवसेंदिवस वाढतच असून प्रवासी वाहतुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) अलीकडेच बेळगावी विमानतळाची मोठी प्रगती दर्शविणारी काही नवीन आकडेवारी दिली आहे! गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत तब्बल 71% वाढ झाली आहे.
डिसेंबर 2023 मध्ये बेळगाव विमानतळाने एकूण 35,232 प्रवाशांचे स्वागत केले. या विमानतळावर यापूर्वी कधीच लोकांची इतकी गर्दी झाली नव्हती.
विमान तळ प्राधिकरणाने दिलेल्या आकड्या नुसार डिसेंबर महिन्यात 591 उड्डाणे चालवण्यात आल्याचं देखील आकडेवारीत समोर आले आहे.
सुमारे २ मेट्रिक टन माल हलवण्यात आला. त्यामुळे या विमानतळावरून केवळ माणसेच नाहीत, तर मालाचीही ( कार्गो सेवा)वाहतूक होत आहे.
डिसेंबर 2023 (एप्रिल ते डिसेंबर) पर्यंत बेळगाव विमान तळावरून तब्बल 2,23,013 प्रवाशांनी उड्डाण केले आहे. बेळगाव विमानतळ दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, हैदराबाद, अहमदाबाद, नागपूर, सुरत, जोधपूर, जयपूर आणि अगदी तिरुपतीशी जोडलेले आहे.
स्टार एअर बेळगाव ते अहमदाबाद मार्गे अहमदाबाद, जोधपूर, मुंबई, सुरत, तिरुपती, नागपूर, जयपूर आणि भुजसह प्रमुख भारतीय शहरांसाठी थेट उड्डाणे देते. दुसरीकडे, इंडिगो बेळगाव ते नवी दिल्ली, बेंगळुरू (दोन उड्डाणे) आणि हैदराबादसाठी दररोज उड्डाणे चालवते.