बेळगाव लाईव्ह :मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या सेवा केंद्राला शनिवारी पोलीस प्रशासनाने नोटीस बजावली आहे. सदर सेवा केंद्र हे आठ दिवसांकरिता बंद ठेवण्याचे आदेश आरोग्य अधिकारी महेश कोणी यांनी दिले आहेत त्यामुळे आगामी आठ दिवस समितीची ही सेवा केंद्रे आता काही दिवसांसाठी बंद असणार आहेत.
बेळगाव शहरात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून आरोग्य मदत मिळवण्यासाठी अर्ज संकलन केंद्रांना सुरुवात करण्यात आली होती त्या केंद्रांना नोटीस देण्यात आली आहे.
गोवावेस सर्कल येथील सुनील बोकडे यांच्या सिद्धिविनायक कॉमन सेवा सेंटर मध्ये महाराष्ट्र सरकारने लागू केलेल्या वैद्यकीय सहाय्यता निधी मदत करण्यात येत होतो याचा पोटशुळ कन्नड संघटनांना उठल्याने कानडी संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत या योजना बंद पाडाव्यात अशी तक्रार केली होती त्यावर जिल्हाधिकारी यांनी पोलीस आणि आरोग्य खात्याला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यावर प्रशासनाने ही कारवाई करत कार्यालये आठ दिवस बंद करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
शनिवारी गोवा वेस सर्कल मधील समितीच्या सेवा केंद्राला नोटीस बजावण्यात आली मात्र नोटीस हातात न देता केवळ स्वाक्षरी करून घेण्यात आली आहे आणि सेवा केंद्र 8 दिवस बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माणुसकीच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने गोरगरीब रुग्णांना मदत व्हावी यासाठी मदतीची योजना सुरू केली होती मात्र कर्नाटक प्रशासन बेळगाव वासियांना या त्या माध्यमातून डिवचण्याचा प्रकार करत आहे त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.